नायगाव : येथील दूरसंचार कार्यालयाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित केल्याने नायगाव खोऱ्यातील बीएसएनएल सेवा नॉट रिचेबल झाली आहे. बँका, पतसंस्था व शासकीय आॅनलाइनचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून नायगाव परिसरातील बीएसएनएलची सेवा वीजपुरवठ्याअभावी ठप्प झाली आहे. येथील भारत संचार निगम कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण संच बंद पडल्याने मोबाइल, लॅण्डलाइन व आॅनलाइनची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून परिसरातील आॅनलाइन कामकाज बंद पडल्यामुळे नागरिकांचे सर्वच कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.नायगाव येथे परिसरातील आठ ते दहा गावांचे बँकिंग व्यवहार हे युनियन बँक, पतसंस्था, गोदा युनियन ऋषक संस्था आदी संस्थासह शैक्षणिक संस्था व ई-सेवा केंद्र आदी ठिकाणी असते; मात्र शनिवारपासून (दि.२८) आॅनलाइनसाठी लागणारे नेटवर्कमिळत नसल्यामुळे परिसरातील कामकाज ठप्प झाले आहे. वारंवार निर्माण होणाºया नेटवर्कच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहे, त्यामुळे येथील थकबाकीत गेलेल्या बिलाचा भरणा करून बीएसएनएलची सेवा सुरळीत करण्याची मागणी सूर्योदय पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन कातकाडे यांनी केली आहे.
नायगाव खोरे परिसरात बीएसएनएल सेवा नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:40 AM
नायगाव : येथील दूरसंचार कार्यालयाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित केल्याने नायगाव खोऱ्यातील बीएसएनएल सेवा नॉट रिचेबल झाली आहे. बँका, पतसंस्था व शासकीय आॅनलाइनचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देभारत संचार निगम कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.