पिंपळगाव बसवंत : गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील मोबाइल नेटवर्कची बत्ती गूल झाल्याने ‘आपण ज्या नंबरशी संपर्क साधत आहात, तो नंबर अस्तित्वात नाही किंवा नॉट रिचेबल’ यासारख्या उत्तराने पिंपळगावकर ग्राहक हैराण झाले आहेत. याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएलने वीजबिलच भरले नसल्याने टॉवरचा वीजपुरवठा खंडित केला असल्याचे समजले. या प्रकारामुळे बीएसएनएलच्या नेटवर्कवर अवलंबून असलेल्या सर्व मोबाइल ग्राहकांना नेटवर्कच अस्तित्वात नसल्याचा धक्का बसला आहे.महावितरणकडून पिंपळगाव बसवंत येथील आठ बीएसएनएल टीडी टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या टॉवर्सवरून सुरू असलेली नेटवर्कसेवादेखील ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणकडून थकीत ग्राहकांवर कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी विभागांचादेखील समावेश आहे. पिंपळगावमधील बीएसएनएलच्या टीडी टॉवरला आठ वीजमीटर आहेत. बीएसएनएलकडून ७ लाख ८३ हजार रुपये थकविण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेले वीजमीटरच बंद करण्यात आले आहेत. याबाबत बीएसएनएलशी संपर्क केला असता बीएसएनएलच्या कार्यालयीन कामकाजाचा निधी दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून येतो. निधी येताच वीजबिल भरणार आहोत. दोन्ही सेवा सरकारी आहेत. आम्ही महावितरणशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत असे सांगितले जात आहे.
बीएसएनएल टॉवरचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:30 AM
गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील मोबाइल नेटवर्कची बत्ती गूल झाल्याने ‘आपण ज्या नंबरशी संपर्क साधत आहात, तो नंबर अस्तित्वात नाही किंवा नॉट रिचेबल’ यासारख्या उत्तराने पिंपळगावकर ग्राहक हैराण झाले आहेत. याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएलने वीजबिलच भरले नसल्याने टॉवरचा वीजपुरवठा खंडित केला असल्याचे समजले.
ठळक मुद्देग्राहकांचे हाल । ७ लाख ८३ हजारांची थकबाकी