नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यापूर्वीही कंपनीने चांगले नेटवर्क उभे केेले आहे. त्यामुळे तेथे प्रतिसाद आहे. आता सुरगाणा, इगतपूरी, दिंडोरी हे तीन तालुके वगळता सर्वच तालुक्यात फोरजी सेवा देण्यात येणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच बागलाण तालुक्यातील चिराई, कुपखेडा, केरसाणे या तीन गावात सध्या कोणतीही मोबाईल सेवा नाही, त्या गावात थ्री जी सेवा सुरू करण्यात येणार आहे. कृषी कार्डपेक्षादेखील आता दर कमी झाल्याने ग्रामीण भागात ही सेवा चांगलीच माफत दरात उपलब्ध आहेत. याशिवाय केंद्र शासनाने ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे ठरवले होते. त्यात सहाशेहून अधिक ग्रामपंचायती निगमच्या माध्यमातून डिजिटल करण्यात आल्या आहेत. यानंतरही शासनच्या आदेशानुसार जाळे विस्तारण्यासाठी निगम सज्ज आहे.
- नितीन महाजन, महाप्रबंधक, बीएसएनएल, नाशिक