सिन्नर : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील नि-हाळे (फत्तेपूर) येथील श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या दोन दिवशीय यात्रोत्सव नुकताच संपन्न झाला. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या प्रारंभाला दोन दिवस श्री क्षेत्र बुवाजी बाबांचा यात्रोत्सव भरतो. नि-हाळे येथे सुरुवातीला बुवाजी बाबांच्या केवळ पादुकावजा मंदिर होते. सन २००४ साली मंदिराचे पुजारी महंत बबनराव सांगळे यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बुवाजी बाबांचे मंदिर साकारले आहे. तेव्हापासून या यात्रोत्सवाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी येथे यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर्षी दोन दिवसीय यात्रोत्सव उत्साहात भरला होता. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता बुवाजी बाबा यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री आठ वाजता किसन महाराज काकड यांचे कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता महंत उध्दव महाराज मंडलीक (तुकाराम महाराज संस्थान, नेवासे) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद व देवाचा कार्यक्रम झाला. दिवसेंदिवस यात्रेला भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र होते. राज्यभरातून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. दोन दिवस चालणाºया या यात्रोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात्रोत्सवास आमदार नरेंद्र दराडे, मुंबईचे माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, विद्या चव्हाण, डॉ. सुधीर तांबे, डॉ. कांचन खाडे,सुनील बागूल, कोंडाजीमामा आव्हाड, माालती आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सचिन जाधव, ज्योतीबा पाटील, सुनील पाटील यांच्यासह यात्रा कमिटी व निºहाळे-फत्तेपूर ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजन महंत बबनराव सांगळे यांनी आभार मानले.
नि-हाळे येथे बुवाजी बाबा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:29 PM