नाशिक : जिल्ह्यातील निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह कळवण नगरपंचायतींसाठी आजपासून म्हणजेच दि. १ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा बिगुल आजपासून वाजण्यास प्रारंभ होईल. पाचही ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. यंदा तरुण चेहऱ्यांमध्ये उत्साह जास्त दिसून येत असल्याने निवडणुकांमध्ये चुरस दिसून येण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर बुधवार (दि.२४) पासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली. आता निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी होण्यास उत्सुक असून राजकीय पक्षांकडूनही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पाचही नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून, २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमअर्ज दाखल कालावधी - दि. १ ते ७ डिसेंबरअर्जाची छाननी - दि. ८ डिसेंबरमाघारीचा दिनांक - दि. १३ डिसेंबरअपिलाचा कालावधी - दि. १६ डिसेंबरपर्यंतचिन्हांचे वाटप - दि. १४ डिसेंबरमतदान - दि. २१ डिसेंबरमतमोजणी - दि. २२ डिसेंबर
जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींचा आजपासून बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 11:29 PM
नाशिक : जिल्ह्यातील निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह कळवण नगरपंचायतींसाठी आजपासून म्हणजेच दि. १ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा बिगुल आजपासून वाजण्यास प्रारंभ होईल. पाचही ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. यंदा तरुण चेहऱ्यांमध्ये उत्साह जास्त दिसून येत असल्याने निवडणुकांमध्ये चुरस दिसून येण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित