नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आयुक्तालयाकडून शरणपूररोड येथील शरणपूर पोलीस चौकीचे आधुनिकीकरण व महिला सुरक्षा विभागांतर्गत ‘भरोसा सेल’ कक्षाची नव्याने स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, अमोल तांबे, विजय खरात आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, निर्भया पथक व भरोसा सेलद्वारे नागरिक पोलिसांच्या कारवाईविषयी आश्वस्तदरी मातोरी येथील अनैसर्गिक क्रूर अत्याचार प्रकरणात ज्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीने निष्पाप युवकांना अमानुष मारहाण केली त्या सर्वांना तत्काळ अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून संशयितांना पाठीशी घातले जात असल्याचे होत असलेले आरोप पोलीसप्रमुखांनी कारवाई करून खोडून काढावे व तत्काळ शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी नागरिकांशी मैत्रीपूर्ण भावनेने वर्तन करायला हवे.- छगन भुजबळ,पालकमंत्री
धडक कारवाईतून ‘भरोसा’ निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:55 PM
पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ठळक मुद्देछगन भुजबळ : शरणपूर पोलीस चौकीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन