पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 03:16 PM2020-09-02T15:16:01+5:302020-09-02T15:16:42+5:30
निफाड : कॉँग्रेस पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे त्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करा. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जोमाने करावे व अधिकाधिक माणसांपर्यंत पक्षाचा विचार कसा जाईल याची जाणीव ठेवून काम करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केले.
निफाड : कॉँग्रेस पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे त्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करा. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जोमाने करावे व अधिकाधिक माणसांपर्यंत पक्षाचा विचार कसा जाईल याची जाणीव ठेवून काम करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुका कॉग्रेसची आढावा बैठक निफाड येथे कॉग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुजफ्फर हुसेन बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते, निफाड तालुका प्रभारी रमेश कहांडोळे, कॉँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अडसरे, निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, नाशिक शहर कॉग्रेसचे स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे होते. यांनी केले.
याप्रसंगी तालुक्यातील कॉग्रेसच्या विविध सेलच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून तालुक्यात चालू असलेल्या कार्याचा आढावा दिला. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाभर सुरू असलेल्या पक्षकार्याची माहिती दिली. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांनी पक्ष बांधणी व पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी व युवकांमध्ये पक्षाची विचारधारा रु जवण्यासाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, याबद्दल सूचना केल्या. अनुसूचित जाती तालुक्याचे अध्यक्ष राजेश लोखंडे यांनी या माध्यमातून अनुसूचित जाती, तरु ण-बेरोजगारांसाठी काम सुरू असून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रि या शासनाच्या अनुसूचित जातीसाठी असलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम तसेच निवेदन व मोर्चे यांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करीत असल्याबद्दल माहिती दिली.
राजाराम पांनगव्हाणे यांनी कॉग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास या तालुक्यात भक्कमपणे कॉँग्रेसची बांधणी होईल, यासाठी कार्यकर्त्यांना जे काही सहकार्य लागेल ते देण्यास तयार असल्याचे त्यांनीसांगितले.
याप्रसंगी तुषार शेवाळे, शरद आहेर, दिगंबर गीते, मधुकर शेलार, साधना जाधव, राजेश लोखंडे, सचिन खडताळे आदींची भाषणे झाली.
याप्रसंगी नगर जिल्हा कॉँग्रेसचे प्रभारी ज्ञानेश्वर गायकवाड, साहेबराव ढोमसे, रज्जाक शेख, सुनिल निकाळे, डॉ. विकास चांदर, सतीश पवार, शाम शिंदे, भैय्या देशमुख, माधव निचित, शकील शेख, गुणवंत होळकर, राजेंद्र बागडे, बाबासाहेब सोमवंशी, मधुसूदन आव्हाड, संपत कराड, नगरसेविका नयना निकाळे, राजेश लोखंडे ज्ञानेश्वर मोगल, राहुल जमधाडे, अझर मिर्झा, राहुल पवार, सुरज साळवे, राहुल नागरे, अनिल शिंदे, बापूसाहेब शिंदे, योगेश डुकरे, पृथ्वीराज मोगल, ज्ञानेश्वर मोगल, मीरा भार्इंदरचे युवक कॉग्रेसचे अध्यक्ष दीप काकडे आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.