नाशिक : बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, परंतु यामुळे वाळू, माती, डोंगर अशा नैसर्गिक बाबींचा ºहास होत आहे. यामुळे कॉँक्र ीटचे जंगल निर्माण झाले आहे. निसर्गाचे कसे संवर्धन होईल याचा विचारही संघटनेने करावा. सोबतच नाशिकमधील पौराणिक व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायचे काम बी.ए.आय.ने करावे, असे आवाहन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले. ते बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया (बी.ए.आय)च्या नाशिक शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, नूतन अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, विश्वस्त मोहन कटारिया, मावळते अध्यक्ष गोपाल अटल, मावळते सचिव अरविंद पटेल व नूतन सचिव भाऊसाहेब सांगळे हे मान्यवर उपस्थित होते.नूतन अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी त्यांच्या आगामी कार्याची रूपरेषा मांडली. प्रास्ताविकात मावळते अध्यक्ष गोपाल अटल यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यात अध्यक्ष - राहुल सूर्यवंशी, सचिव - भाऊसाहेब सांगळे, उपाध्यक्ष - मनोज खाडेकर, खजिनदार - संदीप गरगोडे, सहसचिव - विलास निफाडे, अभय चोकसी, दीपक धाराराव यांचा समावेश होता. सूत्रसंचालन अनुराधा मठकरी यांनी तर आभार भाऊसाहेब सांगळे यांनी मानले.उद्योग पुन्हा भरारी घेईल : अरुण गुजराथीविधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी म्हणाले की, मागणी व पुरवठा यांचा समतोल बिघडल्याने हे क्षेत्र आज अडचणीत असून, मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा हा उद्योग पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिल्डर्स असोसिएशनचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:15 PM