नाशिक : राज्य ग्राहक तक्र ार निवारण मंचच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत चार बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचने दोन वर्षे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच संबंधिताना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला. इमारतीतील सदनिकाधारकांना खरेदीखत नोंदवून देण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.यशवंत महाराज पटांगण परिसरातील गंगा मंदिर सहकारी हौसिंग सोसायटीच्या दाव्यात ए. जी. बिल्डर्सचे भागीदार नंदकिशोर अवधूत आघारकर, प्रवीण हरिभाऊ धात्रक, पांडुरंग दत्तात्रय बोधले आणि नितीन हरिभाऊ धात्रक यांना दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली. असल्याचे तक्रारदारांचे वकील दिनेश रणदिवे यांनी सांगितले. इमारतीत सदनिका घेतल्यापासून ग्राहक खरेदीखत करून देण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करत असताना संबंधित टाळाटाळ करीत असल्याने सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र वझे यांनी प्रथम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली होती. मात्र, मुदतीच्या मुद्द्यावरून मंचाने तो दावा निकाली काढला. ही जागा विकसित करताना जो करारनामा केला गेला, त्याचे मुद्रांक शुल्कच भरलेले नव्हते. सोसायटीच्या संमतीविना रहिवासी जागा व्यावसायिक वापर अशी बदलण्यात आली. सोसायटीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नव्हता. त्यामुळे रहिवाशांचे खरेदीखत नोंदविले जात नसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व बाबी लक्षात घेऊन मंचने राज्य ग्राहक तक्र ार निवारण मंचाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिक-जागा मालकांना दोषी ठरविले. याप्रकरणी आघारकर, प्रवीण व नितीन धात्रक आणि बोधले या चार जणांना दोन वर्षांची साधी कैद ठोठावण्यात आली. तसेच संबंधिताना प्रत्येकी दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याबाबतची माहिती तक्र ारदाराचे वकील अॅड. दिनेश रणदिवे यांनी दिली. जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळोखे- कुलकर्णी आणि कारभारी जाधव यांनी हा निकाल दिला. दोषींनी न्यायालयात दंडाची रक्कम भरली. या प्रकरणात जामीन मिळवला आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षे कैद
By admin | Published: September 02, 2016 1:21 AM