त्र्यंबकेश्वर : शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवकांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.गुरुवारपासून त्र्यंबकेश्वर शहरात अतिक्र मण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत व्यावसायिकांचे अतिक्र मण पालिकेच्या अतिक्र मणविरोधी पथकाने जमीनदोस्त केले. या टपरीधारकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी नगरसेवकांनी धरणे आंदोलन करून घरचाच आहेर दिला. शहरविकास आराखडा दर दहा वर्षांनी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण बैठकीत तयार केला जातो. दहा वर्षांत शहरात कोणकोणती विकासकामे करायची याबाबत आराखडा मंजूर करून ठेवला जातो. त्याला डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) म्हणतात. हाच डीपी प्लॅन तयार करून मंत्रालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे हा आराखडा मागील कौन्सिलच्या काळात पाठविलेला आहे. त्यानंतर विद्यमान कौन्सिलला दीड वर्षाचा कालावधी झाला आहे.त्र्यंबक नगर परिषदेने सन २०१८ मध्ये तयार केलेला विकास आराखडा मंत्रालयातून अद्याप मंजूर होऊन आलेला नाही. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प आहेत. यामुळे बेरोजगारांना नोकरी नाही, हातावर पोट भरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी प्र. नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष कैलास चोथे, नगरसेवक दीपक गिते, शांताराम बागुल, कुणाल उगले, विष्णू दोबाडे, सागर उजे, काळू भांगरे, संपत बदादे, नितीन रामायणे, मीराबाई लहांगे आदींनी डीपी प्लॅन मंजूर करावा यासाठी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, शेलार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे आदींचा मुंबई येथे जाण्यासाठी शिष्टमंडळात समावेश करावा, प्रामुख्याने त्र्यंबक नगर परिषदेच्या डीपीसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी धरणे धरले. यावेळी अनेक विस्थापित व्यावसायिक उपस्थित होते.नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. लवकरच आपण मुंबईला जाऊन डीपीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरविकास आराखडा (डीपी) तयार असल्यास अगर कोणाची स्वाक्षरी होणे बाकी असल्यास स्वाक्षरी घेउन येउ. असे ठोक आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. (२१ टीबीके १ ते ५)
त्र्यंबकेश्वरला अतिक्रमणांवर बुलडोझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 6:45 PM
त्र्यंबकेश्वर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवकांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.
ठळक मुद्देटपरीधारकांच्या पुनर्वसनाची मागणी : नगरसेवकांचे पालिकेसमोर धरणे, घोषणाबाजी!