पंचवटी : कृषी उत्पन्न बाजार समितीत ई-नाम योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदत वाढवून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच स्वीकारणाºया बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर या प्रकरणातील तक्रारदारास दमबाजी झाल्याचा प्रकार घडला आहे. चुंभळे यांचा मुलगा संशयित अजिंक्य चुंभळे याने हा प्रकार केल्याची फिर्याद तक्रारदारांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली असून, अजिंक्य चुंभळेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार समिती सभापती चुंभळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देणाºया तक्रारदाराला अजिंक्य चुंभळे याने रस्त्यात अडवून दमदाटी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकारानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अजिंक्य चुंभळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कार्यालयाबाहेर गोंधळबाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर शुक्रवारी (दि.१६) लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रोकड घेताना सापळा रचून कारवाई केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास संबंधित तक्रारदार बाजार समिती कार्यालयातून बाहेर पडून हॉटेल गोंधळ येथून चारचाकीतून जाताना चुंभळे यांचा मुलगा अजिंक्य याने तक्रारदाराच्या गाडीला गाडी आडवी मारून, माझ्या वडिलांना काही झाले तर बघून घेईल, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
चुंभळेंच्या मुलाकडून दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:54 AM