लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : येथील शास्त्रीनगर बंधाऱ्याचे जलपूजन पंचायत समिती सदस्य रंजना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.लासलगाव येथील शिव नदीवर शास्त्रीनगर वसाहतीजवळील बंधारा काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरल्याने शास्त्रीनगरसह परिसरातील पिंपळगाव नजीक व लासलगाव भागातील नागरिक आनंदित झाले. गत चार वर्षांपासून या नदीला पाणीच आले नव्हते. शास्त्रीनगर वसाहत ही महाराष्ट्रातील अत्यंत जुनी नागरी वसाहत असून, एकेकाळी या बंधाऱ्यावर लासलगाव व परिसरातील नागरिक या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असत. कालांतराने लोकसंख्या वाढल्याने व पर्जन्यमान घसरल्याने या बंधाऱ्याची दुरवस्था झाली. यावेळी भाजपा नेते प्रकाश दायमा व शास्त्रीनगर वसाहतीचे चेअरमन संजय पाटील, फारूक मौलाना, किशोर क्षीरसागर, राजाभाऊ काट, रामनाथ मुंदडा, सतीशशेठ बिरार, पाटील, प्रा. ढाकरे, पिंपळगाव नजीकचे ग्रामपंचायत सदस्य चारुदत्त आढाव, विठ्ठलराव खुटे, दिलीप पानगव्हाणे या मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. गणेश व गंगामाता आरतीही करण्यात आली. या बंधाऱ्याच्या नजीक लासलगाव महाविद्यालय असल्याने आजपासून कॉलेजकुमारांना परिसर अधिक रमणीय वाटेल. या पाण्याने परिसराचे रूप पालटले आहे. बऱ्याच दिवसांनंतर दिसलेल्या पाण्याचे मोल नागरिकांना जाणवते आहे. यावेळी दीपक शिरापुरे, मंजीत सेखो, प्रवीण कंगुणे, मनोज कासव, बाळासाहेब सीमंत, मनोज कुमावत, शैलेश थोरात, गणेश जाधव, आप्पा थोरे, प्रा. खैरनार, प्रकाश ठोंबरे, विकास दरेकर, मनोज सोनवणे, सुनीता सूर्यवंशी, स्मिता क्षीरसागर, सुशीला बैरागी आदी उपस्थित होते. लासलगाव येथील शिव नदीवरील बंधारा भरल्यानंतर जलपूजन करताना रंजना पाटील, किशोर क्षीरसागर, राजाभाऊ काट, रामनाथ मुंदडा, सतीशशेठ बिरार आदी़
शिव नदीवरील बंधारा तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:46 AM