येवला : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येवला नगर परिषदेच्या गटनेतेपदी प्रवीण बनकर यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांचा पाठिंबा दिला आहे, तर आता नगराध्यक्ष बदल करण्याच्या चर्चेला उधाण आले असून, विकासकामे होत नसल्याचा आरोपही नगरसेवकांसह राजकीय वर्तुळातून होत आहे.दरम्यान, राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या पालिकेत डॉ. संकेत शिंदे यांनी सुरुवातीची तीन वर्षे पालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेतेपदी काम केले आहे, मात्र आता प्रवीण बनकर यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आली आहे. त्यात राष्ट्रवादी-सेना-कॉँग्रेस अशी मोट बांधली गेली आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकवटले आहेत. अशा परिस्थितीत येवला पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष आहे.येवला पालिकेत राष्ट्रवादी १०, शिवसेना ५, शहर विकास आघाडी ५ आणि भाजप ४ असे नगरसेवकांचे पक्षीय बलाबल आहे. मालमत्ता करवाढीचा मुद्दा ऐरणीवर आहे. विकासकामे होत नसल्याचा आरोप नगरसेवक करीत आहे. अशा परिस्थितीत विकासकामे होत नसल्याचे पांघरूण घेऊन सहमतीने गटनेता बदलाची पहिली पायरी रचली गेल्याने पालिकेत सत्ताबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रवीण बनकर यांनी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक लोणारी, कृउबा संचालक नवनाथ काळे, शहर सरचिटणीस सुमित थोरात यांच्या समवेत भुजबळ यांची भेट घेतली.काय घडते याकडे लक्षराज्य शासनाने नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा केला. यामुळे येवल्यात पालिका वर्तुळात नगरसेवकांच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. अनेकांना पालवी फुटली आहे. या चर्चेला काही अर्थ नसला तरी किमान आधी लगीन कोंढाण्याचं अर्थात वाढीव मालमत्ता कराचा बोजा म्हणत यानिमित्ताने नगरसेवक एकत्र आले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर पालिकेत विकासकामे होत नसल्याचा सूर आळवला गेला. जिल्हाधिकारी यांना दरम्यान निवेदनही दिले गेले. पालिकेच्या सत्तास्थानाची दिशा नगरसेवकांच्या मर्जीनुसार ठरत नाही, तर पालिकेच्या वर्तुळात छगन भुजबळ यांचा हिरवा झेंडा, सेनेचे आमदार दराडे बंधू आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या शब्दाला विशेष महत्त्व असल्याने पालिकेची दिशा ठरणार आहे.
पालिका गटनेतेपदी बनकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:16 PM
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येवला नगर परिषदेच्या गटनेतेपदी प्रवीण बनकर यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांचा पाठिंबा दिला आहे, तर आता नगराध्यक्ष बदल करण्याच्या चर्चेला उधाण आले असून, विकासकामे होत नसल्याचा आरोपही नगरसेवकांसह राजकीय वर्तुळातून होत आहे.
ठळक मुद्देयेवला : नगराध्यक्ष बदलाच्या चर्चा