नाशिक : निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून नियोजन करण्यात आले होते. असे असतानाही बीएलओंकडून काम करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात होताच पहिल्या काही दिवसांत बीएलओंकडून असमर्थता दर्शविली जात आहे. जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, अतिशय संथगतीने हे काम सुरू होते. दिलेल्या डेडलाइनमध्ये ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली. त्यामुळे या मोहिमेला येत्या दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदतीत अपेक्षित काम नसतानाही केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली आहे. शुक्र वार (दि.१०)पर्यंत ४५ लाख ६१ हजारांपैकी अवघ्या ४ लाख २० हजार ६७१ मतदारांचीच पडताळणी झाली असून, एकूण १५ पैकी नऊ विधानसभा मतदारसंघातील पडताळणीचे काम असमाधानकारक असल्याचे समोर आले आहे.उरले केवळ ४० दिवसमतदार पडताळणीचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नसल्याने आता या कामाला दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केवळ ४१ दिवस उरले असून, या दिवसात ४१ लाख मतदारांच्या पडताळणीचे आव्हान बीएलओंसमोर असणार आहे. ज्या मतदारसंघात कामांची अपेक्षित गती नाही तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाणार आहे.
कामचुकार बीएलओंवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:49 PM
निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याचे आदेश : मतदार पडताळणी कामांकडे दुर्लक्ष