शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

उद्यानांचे ओझे आरोग्य विभागावर

By admin | Published: September 30, 2015 10:45 PM

कचरा संकलन : मनपा आरोग्य विभाग मेटाकुटीला

नाशिक : शहरातील उद्यानांमध्ये होणारा पालापाचोळा, झाडांच्या फांद्या यांसह अन्य निर्माण होणारा कचरा संकलनाचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाऐवजी आरोग्य विभागाने करण्याचा फतवा प्रशासनाने काढल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे सदर कामाची पूर्तता करताना आरोग्य विभाग अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. उद्यान विरुद्ध आरोग्य विभागामध्ये संघर्ष पेटला असताना त्याचा परिणाम उद्यानातील देखभालीवर होत आहे. महापालिकेत स्वतंत्र उद्यान विभाग कार्यरत असून, या विभागामार्फत शहरातील ४७० उद्यानांचे नियंत्रण व देखभाल-दुरुस्ती केली जाते. परंतु प्रशासनाने उद्यान विभागातील कामांचे विकेंद्रीकरण करतानाच उद्यान विभागात रोज साचणारा झाडांचा पालापाचोळा, फांद्या तसेच अन्य कचरा संकलनाची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविली आहे. त्यामुळे सदर कामांची पूर्तता करताना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रभागांमध्ये साफसफाईची कामे करण्यासाठी अगोदरच मनुष्यबळ अपुरे असताना आरोग्य विभागाला उद्यानातील कचरा संकलनासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देताना कसरत करावी लागत आहे. उद्यान विभागही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम आमचे नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत आहे. आरोग्य आणि उद्यान विभागाच्या या संघर्षाचा परिणाम उद्यानांच्या देखभालीवर होत असून, अनेक उद्यानांमध्ये सद्यस्थितीत गाजरगवत व कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.