त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी मध्यरात्री नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या लगत असलेले घर चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुचाकीसह सोन्याचे दागिने, मोबाइल व सतरा हजार रु पये रोख रक्कम असा एकूण ५०,५०० किमतीचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.हॉटेल आकारच्या समोरील रस्त्यालगत वास्तव्यास असलेले सदाशिव भगवान मोरे यांचे कुटुंबीय लग्नानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. शनिवारी ते रात्री एकटेच आपल्या खोलीमध्ये झोपले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी मोरे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे तसेच घरातील बॅगा व काही सामान शेजारच्या शेतात आढळून आले.घरातील सामानाची शोधा शोध केली असता सोन्याची पोत, चांदीचे कडे, काही रोख रक्कम व मोबाईलची चोरी झाल्याचे समजले त्या सोबतच शेजारी राहणारे संपत मोरे यांची मोटारसायकल देखील चोरीस गेल्याची फिर्याद मोरे यांनी त्र्यंबक पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबता अधिक तपास त्र्यंबकेश्वर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.
खंबाळे येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:58 AM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी मध्यरात्री नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या लगत असलेले घर चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुचाकीसह सोन्याचे दागिने, मोबाइल व सतरा हजार रु पये रोख रक्कम असा एकूण ५०,५०० किमतीचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.
ठळक मुद्दे५०,५०० किमतीचा मुद्देमाल चोरुन पोबारा मोटारसायकल देखील चोरीस गेल्याची फिर्याद