नाशिक : शहराच्या अत्यंत मध्यवस्तीचा परिसर असलेल्या रविवार कारंजा येथील यशवंत मंडई भागातील युको बॅँकेच्या पाठीमागील भींतीला अज्ञात चोरट्यांनी भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत सिनेस्टाइल लूट करण्याचा प्रयत्न सोमवारी (दि.१०) पहाटे करण्यात आला. चोरट्यांच्या हाती रोकड लागली नसली तरी चोरट्यांनी सीसीटीव्हीचे नुकसान करत बॅँकेतील संगणक लंपास करत पोबारा केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले.शनिवार व रविवार असल्यामुळे बॅँकांना सुटी होती. सोमवारी सकाळी नियमितपणे बॅँका सुरू झाल्या. यावेळी युको बॅँकेचे शटर जेव्हा कर्मचाऱ्यांनी सकाळी उघडले असता तेव्हा बॅँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तसेच पाठीमागील भींतीला भगदाडदेखील आढळून आले. यामुळे बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह श्वान पथक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा केला जात असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी धागेदोरे शोधले जात आहे. चोरट्यांनी बॅँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे नुकसान केल्याचे आढळले. दोन दिवसांपासून बॅँकांना सुटी होती; त्यामुळे हा प्रकार सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी हा सगळा लुटीचा प्रकार शनिवारी मध्यरात्री केला की रविवारी याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
युको बॅँकेच्या भींतीला चोरट्यांकडून भगदाड; संगणक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:31 PM
शनिवार व रविवार असल्यामुळे बॅँकांना सुटी होती. सोमवारी सकाळी नियमितपणे बॅँका सुरू झाल्या. यावेळी युको बॅँकेचे शटर जेव्हा कर्मचाऱ्यांनी सकाळी उघडले असता तेव्हा बॅँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले.
ठळक मुद्दे श्वान पथक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल चोरट्यांचा माग काढण्यासाठी धागेदोरे शोधले जात आहे