बजरंगवाडी येथे हाणामारी
मालेगाव : बजरंगवाडीतील खलील शेठ सायझिंगमध्ये कामगारांच्या पगाराचे वाटप करीत असताना झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी आझादनगर पोलिसांत वाहीद (पूर्ण नाव माहीत नाही) व राफे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महावीरसिंग सोब्रनसिंग राजपूत, रा. संगमेश्वर, पाटकिनारा यांनी आझादनगर पोलिसांत फिर्याद दिली. गेल्या शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे कामगारांचे पगार वाटप असताना संशयित आरोपींनी अली और रेहान हे माल खराब करीत असल्याचे त्यांना सांगितले. फिर्यादीने त्यांच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. याचा राग येऊन संशयितानांनी फिर्यादीला मारहाण करून डोके फोडले. अधिक तपास पोलीस नाईक भगरे करीत आहेत.
भायगाव शिवारातील विहिरीत वृद्धाची आत्महत्या
मालेगाव : गेल्या ५ डिसेंबरपासून घरातून निघून गेलेल्या वसंत तानाजी शिरसाठ (६०, रा. कब्रस्तान गल्ली, पंचशीलनगर) यांनी भायगाव शिवारातील योगेश हिरे यांच्या शेतातील पडीक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. किशोर मधुकर बच्छाव, रा. पंचशीलनगर यांनी पोलिसांना खबर दिली. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक शिलावट करीत आहेत.