नाशिक : तिडके कॉलनी कुटे मार्ग भागात अज्ञात चोरट्यांनी रॉयल अपार्टमेंट येथे गोविंदराव बाबूराव भोसले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदराव बाबूराव भोसले यांनी गुरुवारी (दि. ११) मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान घरफोडी केल्याची फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी घरातून २० हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची पोत, २० हजार रुपये किमतीच्या दोन पाटल्या, तीन हजार रुपयांची सोन्याची नथ, दोन चांदीचे ग्लास यासह ५ हजार चारशे रुपयांची रोकड असा एकूण ४९ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.