चांदोरी येथील गट क्र. ६४८ सतीश गायखे, माणिक गायखे, संजय गायखे या शेतकऱ्यांचा उस जळून खाक झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या उसाच्या क्षेत्रावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. तर काही ठिकाणी या तारा खाली लोंबकळलेल्या आहेत. वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. शिवाय वाऱ्याचे प्रमाणही जास्त असल्याने आग पसरली गेली. ही घटना तात्काळ लक्षात आल्याने शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे बाजूच्या उसाचे क्षेत्र वाचले गेले.
चांदोरी येथील अनेक भागात विजेचा तारा अतिशय कमी उंचीवर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या थेट उसाला चिकटतात व घर्षण होऊन ठिणग्या तयार होऊन आग लागते.
मागील अनेक दिवसांपासून शेतकरी अनेकदा मागणी करूनसुद्धा महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
इन्फो
वीज वाहक तारा कमी उंचीवर
चांदोरी परिसरातील सुकेना रस्ता भागात विद्युत तारांची उंची अतिशय कमी आहे, तसेच अनेक दिवसांपासून त्याची तपासणी झालेली नाही. त्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी मे महिन्यात चांदोरी शिवारात सुमारे दहा एकर ऊस व द्राक्ष बाग वीज तारा तुटून आग लावून जळून खाक झाली होती. यासंदर्भात पंचनामे होऊनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ महिने उलटूनसुद्धा मदत प्राप्त झाली नसल्याचे समोर आले आहे.
कोट...
महावितरण विभागाने चांदोरी शिवारातील खाली आलेल्या तारांचा तसेच रोहित्राचे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा इतर ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
- अनिल भोर, सामाजिक कार्यकर्ते
कोट...
वीज तारांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने दोन पोलमधील अंतर जिथे जास्त असेल तिथे मध्ये पोल टाकणे, पोल सरळ करून ताण देणे व लघु दाब वाहिन्यांवर एल.टी. स्पेसर टाकण्याचे काम सुरू केले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण विभाग प्रयत्नशील आहे.
- विशाल मोरे, सहायक अभियंता, चांदोरी उपकेंद्र
फोटो- ०६ चांदोरी फायर
===Photopath===
060221\06nsk_31_06022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०६ चांदोरी फायर