उजनी शिवारात शोभा देवराम हजारे व सूर्यभान शंकर सापनर यांचे गट क्र.१४/२ मधील उसाचे ६० आर क्षेत्र आहे. सदर ऊस कारखान्याला जाण्याच्या परिस्थितीत होता. सदर उसाचे पिकापासून काही अंतरावर श्रीकांत वाघ हे आपले कांदा पिकास पाणी देत असताना त्यांना रात्री अचानक उसाचे पिकामधून आगीच्या ज्वाला दिसून आल्या. सदर माहिती त्यांनी सापनर यांना दिल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी उसाचे शेतात पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तथापि, आगीत सदर शेतकऱ्याचा ६० गुंठ्यापैकी ३० गुंठे ऊस पूर्णपणे भस्मसात झाला. सदर घटनेने हजारे व सापनर कुटुंबाचे अंदाजे साठ ते सत्तर हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच धाव घेतल्याने उसाचे शेजारील ५ एकर सोंगणीस आलेला गहू व ४ एकर उसाचे पीक वाचविण्यात यश आले.
कोट...
सदर घटनेमुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उसाचे पिकाशेजारी कुठूनही विद्युत प्रवाह नसल्याने सदर आग लागण्याचा संबंध येत नाही. सदर आग ही कुणीतरी खोडसाळपणाने लावलेली असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध मुसळगाव पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार करणार आहे.
- सूर्यभान सापनर, शेतकरी
फोटो - ०२ उजनी फायर
सिन्नर तालुक्यातील उजनी शिवारात आगीमुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान.
===Photopath===
020321\02nsk_55_02032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ उजनी फायर सिन्नर तालुक्यातील उजनी शिवारात आगीमुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान.