शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सटाण्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 8:42 PM

सटाणा : उसाच्या शेतामधील लोंबकळलेल्या वीजतारांबाबत महावितरणकडे वेळोवेळी अर्ज फाटे करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दखल न घेतल्याने, वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर ऊस आगीमध्ये भस्मसात झाल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बागलाण तालुक्यातील निताणे येथे घडली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उसाच्या शेताला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने महावितरणकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

युवराज केदु पवार असे या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून, निताणे येथील गट नंबर ५७२ मध्ये त्यांनी उसाची लागवड केली होती. २० ऑक्टोबर, २०२० रोजी पवार यांनी महावितरणच्या शाखा अभियंता यांना रीतसर अर्ज केला होता. उसाच्या शेतामध्ये असलेल्या वीजतारांच्या दोन पोलमधील अंतर जास्त असल्याने वीजतारांची झोळी झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता व्यक्त करत, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी अर्जात केली होती. महावितरणच्या शाखा अभियंता यांनी पवार यांच्या तक्रारअर्जावर संबंधित वायरमन यांना आदेश दिल्याचा शेराही मारलेला असताना प्रत्यक्षात मात्र, कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास युवराज पवार यांच्या शेतातील वीजतारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत काढणीला आलेला तीन एकर ऊस खाक झाला आहे.उसाला आग लागल्याची माहिती परिसरात पसरताच, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत तीन एकर उसांची व त्यातील ठिबक सिंचनाची राख झाली होती. सदर घटनेचा महावितरणने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी युवराज पवार यांनी महावितरणकडे केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकfireआग