लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : म्हाळसाकोरे येथील राजवाडा परिसरातील रोहित्र बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून निम्म्याहून अधिक गावाचा वीजपुरवठा खंडित झाला झाल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे.सदर रोहित्रावर विजेचा भार हा जास्त प्रमाणात असल्यामुळे शुक्रवारी पहाटे ही तीनही रोहित्र एकाच वेळी बंद पडली. गावातील ऐंशीहून अधिक घरांसह २०हून अधिक दुकाने, पीठगिरण्या गावातील पथदीप आदींचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यातच पुढील महिन्यापासून इयत्ता बारावी आणि दहावीचा परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडथळा निर्माण होत आहे.महावितरण मंडळाने लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीतकरावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.लवकरच वीजपुरवठा सुरू होईल. रोहित्र बंद पडल्याची माहिती मिळताच आम्ही त्याबाबतचा पाठपुरावा करून या बाबतची संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली आहे. मात्र वीज मंडळाकडे रोहित्र मिळत नसल्याने अतिरिक्त दोन रोहित्र तातडीने इतर वीजपुरवठा केंद्रातून मागवले आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होईल.- मनीषा वासने,कनिष्ठ अभियंता, म्हाळसाकोरे
रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:01 AM
चांदोरी : म्हाळसाकोरे येथील राजवाडा परिसरातील रोहित्र बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून निम्म्याहून अधिक गावाचा वीजपुरवठा खंडित झाला झाल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे.
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडथळा निर्माण होत आहे.