शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

निफाड तालक्यात साडेतीन एकरावरील ऊस जळून खाक, शॉटसर्कीटने लागली आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:53 PM

नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे ...

ठळक मुद्देचेहडी खुर्द शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाकमहावितरणच्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आगपीकाचे पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे यांचे शेती असून, यातील साडेतीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड होती. सदर ऊस पीकाची तोडणीसाठी रितक्षा होती. मात्र रविवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील डीपीवर शॉटसर्कीट झाली, यात संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाला. ऊसाला लाग लागल्याचे कळताच, आजू-बाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीचे स्वरूप भयान असल्याने सर्व पीक काही क्षणात खाक होऊन गेले. यापूर्वीही सन २००८ मध्ये शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉटसक्रीट होऊन पीक जळल्याची घटना घडली होती. त्यामुळे डीपी बदलाची मागणी महावितरण यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, महावितरणकडून याकडे दुर्लक्ष झाले. या घटनेनंतर गावचे सरपंच किरण सानप, माजी सरपंच दशरथ रूमणे यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली. सोमवारी (दि.१८) सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी जळालेल्या क्षेत्राची पाहणी करून, त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. पीक जळाल्याने लाखो रूपयांची हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांस मदत द्यावी अशी मागणी परिसकरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

महावितरणचे दुर्लक्षआग लागू ऊस जळालेल्या शेतातील डीपी दुरूस्तीबाबब ग्रामपंचायतीतर्फे महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामपंचायतींने दोनदा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र,महावितरणने दुर्लक्ष केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चेहडी खुर्द ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.