- मनोज देवरेखामगाव दिशेने निघालेल्या एस टी बसचा सप्तश्रुंगी गड घाटात गणपती टप्प्याजवळ 400 फूट दरीत कोसळून अपघात झाला. सकाळी 6:22 वाजता अपघाताची घटना काशिनाथ गायकवाड या शेतकऱ्यांने बघितली आणि तात्काळ नांदुरी चौकीत तत्पर सेवा बजाविणाऱ्या वाहतूक पोलीस योगेश गवळी यांना माहिती दिली. गवळी यांची सध्या नाशिक येथे बदली झालेली असून कर्तव्यात कसूर न करता योगेश गवळी यांनी सप्तश्रुंग गड आणि नांदुरी येथे सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करुन तात्काळ मदतकार्य उभे केले. त्यामुळे मदतीचा ओघ तात्काळ मिळाला.घाटात सकाळी धुके असतात त्यामुळे अपघाताची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांनी धाव घेऊन जखमी रुग्णांची विचारपूस करुन घटनेची माहिती घेतली. प्रशासकीय यंत्रणेला सूचना केल्या. सप्तश्रुंगी निवासनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, संदीप बेनके, राजेश गवळी, अजय दुबे, सुभाष राऊत, शांताराम सदगीर व सहकारी यांनी मदतकार्य केले. 16 प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील 4 प्रवासी आहेत. इतर 2 बस चालक व कंडक्टर तर 1 नाव अद्याप कळाले नाही.
खामगाव बसमध्ये चालक व वाहकसह 23 प्रवासी होते. एक महिला प्रवासी मयत झाले असून मयत महिलेचे नाव आशा राजेंद्र पाटील (वय 50 ते 55 वर्ष दरम्यान) असे असून पत्ता अद्याप कळले नाही.खामगाव बस मध्ये चालक व कंडक्टर सह 24 प्रवासी होते.6 प्रवासी रुग्ण वणी ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत 17 रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहेत.