देवळा : विंचूर-प्रकाशा या राज्य मार्गावरील भाबडबारी घाट उतरत असताना सटाणा आगाराच्या बसला अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शनिवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.समोरून अचानक ट्रक आल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बस कठड्याला जाऊन धडकली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सुदैवाने बस नियंत्रणात आली नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती अशा प्रतिक्रि या प्रत्यक्षदर्शींनी दिली.बसचालक सुधीर तिडके यांनी देवळा पोलिसांत अपघाताची फिर्याद दिली. बसमध्ये ११ प्रवासी होते. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अनर्थ टळलाशनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सटाणा आगाराची बस (क्र . एमएच.४०वाय ५९९६) नाशिकहून सटाण्याकडे येत होती. बस भावडबारी घाट उतरत होती. त्यामुळे बस वेगात होती. अचानक ट्रक समोर आल्याने बसवर नियंत्रण मिळवतानाचालकाची धांदल उडाली. तातडीने ब्रेक लावले. बस घाटाच्या कठड्याला धडकली. बसचे थोडे नुकसान झाले आहे.
भाबडबारी घाटात बसची कठड्याला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:27 PM
विंचूर-प्रकाशा या राज्य मार्गावरील भाबडबारी घाट उतरत असताना सटाणा आगाराच्या बसला अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शनिवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. समोरून अचानक ट्रक आल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बस कठड्याला जाऊन धडकली.
ठळक मुद्देदैव बलवत्तर : समोरून वाहन येताच चालकाची उडाली धांदल