नाशिक: नााशिकहून भडगावकडे निघालेल्या कारला नांदगाव नजिक समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. आई आणि भाऊ-बहिण या अपघातात मृत्यूमुखी पडले या अपघातात तीन वर्षीय नातू मात्र बचावला अजून त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे.
मिळालेली माहिती अशी, मयर सर्व नाशिक शहरातील राहाणार असल्याचे समजते. भडगाव येथे आपल्या भावाच्या वास्तुशांतीसाठी नाशिकहून वंदना संतोष ललवाडे (४०), शुभम संतोष ललवाडे (२०), निकिता मनोज शिंदे (२२)आणि तीन वर्षीय बालक नाशिकहून भडगाव येथे निघाली होते. वंदना ललवाडे या आपला भाऊ विश्वानाथ फकिरा पाटील यांच्याकडे वास्तुशांती असल्याने आपला मुलगा शुभम आणि विवाहित मुलगी निकीता आणि तीन वर्षीय नातू असे सर्वजण कार (क्र. एमएच/ १५ /सीडी/२०५७) ने भगडगा येथे सकाळी निघाले होते.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी गावाजवळील हॉटेल तेजस नजिक समोरील एका वाहनाला ओव्हरटेक करणारी चाळीसगाव -मनमाड बस (एमएच./१४/बी.टी/ ४४९८ ) ललवाडे यांच्या कारवार आदळली. बसने कारला समोरून दिलेल्या धडकेने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. त्यास मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातात कारचा चक्काचुर झाला. अपघातात वंदना यांचा मुलगा संतोष आणि मोठी मुलगी निकिता यांचा मृत्यू झाला. एकाच कुटूंबातील तिघांवर काळाने झडप घातल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक सुनील बढे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.