महिला ठार; २० जण जखमी : दर्शन घेऊन गुजरातकडे जाताना अपघात लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथुन जवळच असलेल्या तोरंगण घाटातील भांग्या देवाच्या पुढे खासगी लक्झरी बसच्या चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने बस उलटुन सरस्वती मांगीलाल मीणा (५०) ही महिला ठार झाली . तर अन्य २० प्रवासी जखमी झाले. त्यातील १४ महिलांना जबर मार बसला आहे. अन्य ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले .राजस्थान मधील संगोर्धा जिल्हा कोटा येथील ५० प्रवासी आणि दोन चालक व एक वाहक असे ५३ प्रवासी बस क्र . आर जे २० पीबी १६६ पुरसवानी ट्रॅव्हल्स या गाडीने१३आॅगस्ट २०१७ पासून तीन धाम यात्रेसाठी निघाले होते, हे प्रवासी भीमाशंकर येथून दर्शन करून रात्रीच्या सुमारास २ वाजता त्र्यंबकेश्वर येथे आले होते . रात्रभर विश्रांती घेऊ व सकाळी त्र्यंबकराजाचे , निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन गुजरात मधील सोरटी सोमनाथ येथील आद्य जोतिलिंग असलेले सोमनाथ दर्शनासाठी निघाले होते. सापुतारा मार्गे गुजरात जवळ असताना ते जव्हार-सिल्वासा वापी मार्गे गुजरातकडे प्रवास करीत होते. बहुतेक रस्ता चुकल्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला असावा, दुपारी १२ च्या सुमारास पालघर जिल्हा हद्दीतील अंबोली-तोरंगण घाटात मोखाडा पोलीस स्टेशन हद्दीत तोरंगण जवळ भांग्या देवाच्या पुढे खोल दरीत अतिशय अवघड अशा वळणावर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली, या मध्ये जवळपास ३० प्रवासी जखमी झाले त्यापैकी २० जण जबर जखमी झाले. असून एका वृद्ध मिहलेचा गाडी खाली दबल्याने मृत्यू झाला . जखमींची संख्या २० असली तरी 20 प्रवाशांना जास्त मार लागला आहे. तर अन्य प्रवाशांना किरको किरकोळ मार लागला आहे. स्थानिक शिवसैनिकांच्या मदतीने जखमीना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची नावे -अनिता कैलास अग्रवाल ५०, बद्रीबाई मीणा ६७, फुलवती रामलाल ५०, प्रेमाबाई नंदलाल ६७, धिलाबाई पहुचलाल ६६, जिवनीबाई सुकदेवजी गुज्जर ६५, दिनदयाल लक्ष्मी अग्रवाल ६५, द्वारकाबाई रामिकशन वर्मा ४८, नंदा वर्मा ४०, पुष्पावती मेहता ५०, रु ख्मिणीदेवी मेहता ४०, कुसुमाग्रज अग्रवाल ४०, व कलावती नंदिकशोर गोचड ४५, तर अन्य ६ जण किरकोळ जखमी होते. १४ जखमींना घटनास्थळा रु ग्णवाहिकेतुन नाशिक जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रु ग्णालयात डॉ. प्रशांत नायडु यांनी उपचार केले.
जेवणाची व्यवस्थाजखमींना स्थानिक शिवसैनिकांनी धीर देत जेवणाची व पाण्याची सुविधा उपलब्ध करु न दिली. माजी शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडक यांनी किरकोळ जे जखमी होते त्यांना स्वत:च्या हॉटेल टायगर व्हॅली येथे नेऊन त्यांची राहण्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करु न दिली. यावेळी शिवसैनिक भावडु बोडके विठल बोडके अशोक उघड सुनील मेढे पप्पू मेढे यांनी देखील जखमींना सहकार्य केले.