ताहाराबाद : शेलबारीजवळ बस उलटल्याने १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास नरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करून इतर प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले.ताहाराबादहून कल्याण-साक्र ी बस (एमएच २०, बीएल १३४८) पिंपळनेरकडे जात असताना शेलबारीजवळ एक गतिमंद व्यक्ती रोडवर आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी चालक ठाकरे गाडी बाजूला घेत असताना त्यांचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. झालेल्या अपघातात वेडू तुकाराम पेंढारकर, ललिताबाई वेडू पेंढारकर, यादव पंडित खैरनार, रंजना केशव जिरे, विमलबाई यशवंत, उषा नारायण माळी, ललिता संदीप लोंढे, अनिल गंगाधर खैरनार, मेहरन इजराईल पठाण, रतन जिभाऊ सोनवणे, इस्माईल जिफरात पठाण, जितेंद्र ज्ञानेश्वर माळी, गुलारामपोसल्या माळी, सखुबाई गुलाब माळी, तुळसाबाई इंद्रराम कुवर, राजाबाई साधू सूळ, साधू महिपत सूळ या प्रवाशांना दुखापत झाली. एसटी महामंडळाचे कर्मचारी पंकज देवरे, ललिता गायकवाड, बाबा पाटील, वाशीम पठाण यांनी पंचनामा केला.
शेलबारीजवळ बस उलटली; १७ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 1:06 AM