पेठ : नाशिकहून सकाळी ६ वाजता पेठ आगाराची पुणे- पेठ बस गोळशी फाटया नजिक पलटी झाल्याने बसमधील जवळपास १० प्रवासी जखमी झाले.याबाबत अधिक माहीती अशी की, पेठ आगाराची बस (एमएच-२० बीएल - ४२४८) सकाळी नाशिकहून पेठकडे जात असतांना गोळशी फाट्यानजीक चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला फेकली गेली. चालकाने प्रसंगावधान राखुन बस रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात पलटी झाल्याने बसमधील १० प्रवासी जखमी झाले. जखमींना तात्काळ रूग्णवाहिका व खाजगी वाहनातून नाशिकला हलवण्यात आले. या अपघातात बसचे चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बस रस्त्यावर आडवी झाल्याने काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पेठ आगाराच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.अपघातात जखमींची नावे अशीरामा कुवर (४६) रा. बोर्डींगपाडा पेठ, जनार्दन मुकणे (४४) इंदीरानगर पेठ, गिरीश देशमुख (३४) करंजाळी, संजय त्र्यंबक माळी (५०), सरला संजय माळी (४०) रा. नाशिक, रत्नाकर आहेर (४८) करंजाळी, मधुकर रामा शिंदे (३१) करंजाळी, सुभाष दुधेकर (४५) करंजाळी, तुषार भुसारे (२१) रानविहीर, स्वप्नील चव्हाण, मिलींद लाठे, श्रीमती पवार, पाठक, चालक बी. एम. थोरवे, वाहक आर. पी. गायकवाड.
बस अपघात १० प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:43 PM
पेठ : नाशिकहून सकाळी ६ वाजता पेठ आगाराची पुणे- पेठ बस गोळशी फाटया नजिक पलटी झाल्याने बसमधील जवळपास १० प्रवासी जखमी झाले.
ठळक मुद्देपुणे-पेठ मार्ज : गोळशी फाटयानजीक ताबा सुटून बस पलटी