नाशिक : राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू असल्याने अशा वातावरणात २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यंसाठी बसेस पुरविणार आहे. जिल्ह्यातील ४६ केंद्रांवर सुमारे १८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी नाशिकमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नियोजन केले जात आहे. सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. शनिवार आणि रविवारी तर संपूर्ण बंद पुकारण्यात आलेला आहे. खासगी प्रवासी वाहनांवरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे रविवारी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महामंडळाने बसेसची सुविधा देण्याचा निर्णय घेतलाआहे.बसेस उपलब्ध करून देताना प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. बसेसचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर आणि सुरक्षित प्रवासासाठीचे नियोजन सोमवार, दिनांक १५ रोजी केले जाणार असून, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या एस. टी.कडून सर्व प्रकारच्या नियोजनाला सुरूवात करण्यात आली आहे.
एमपीएससीसाठी धावणार बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 1:30 AM
राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू असल्याने अशा वातावरणात २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यंसाठी बसेस पुरविणार आहे.
ठळक मुद्देनियोजन सुरू : मागणी आल्यास अतिरिक्त बसेसची तयारी