नाशिक : देशभर रोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१०) सकाळपासून शहर बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सकाळपासून दुपारी साडेचारपर्यंत बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रिक्षाने तसेच पायी प्रवास करून इच्छितस्थळी जावे लागले. बससेवा विस्कळीत झाल्याने एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी (दि.१०) सकाळी काही आंदोलनकर्त्यांनी पुणे येथील पीएमटीच्या एसटी बसेसच्या काचा फोडून नुकसान केल्याने नाशिक आगारातील एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी बससेवा थांबवण्यात आली होती. सर्व आगारांमधून ३३४० बसेस दिवसभरात धावतात. सकाळपासूनच शहरातील बससेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. परिसरातील अनेक ठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवाशांनी गर्दी केली होती, मात्र बससेवा बंद असल्याचे समजतात त्यांनी खासगी वाहनांनी पुढचा प्रवास केला. पहाटे ५.३० पासून ७ वाजेपर्यंत नाशिकमधून बाहेरगावच्या काही मोजक्या बस धावल्या. पण सकाळी ८ नंतर पुण्या-मुंबईत आंदोलकांनी सुरू केलेल्या दगडफेकीनंतर व पुण्यात पीएमपीची बस जाळण्याची घटना घडल्यानंतर बसचे नुकसान होऊ नये यासाठी नाशिक आगारातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या.रिक्षाचालकांची चंगळशहरातील एसटी बससेवा विस्कळीत झाली होती. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावा लागला. रिक्षाचालकांनी बस बंदचा पुरेपूर फायदा घेत रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून नियमांची उघडपणे पायमल्ली केली असल्याचे चित्र शहरभर दिसून आले. त्र्यंबक-नाशिक बस बंद, प्रवाशांचे हालसध्या चातुर्मासानिमित्त त्र्यंबकेश्वरी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच सोमवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून बसचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकला जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यांना टॅक्सी, व्हॅनचा पर्याय स्वीकारावा लागला. टॅक्सीचालकांनी जादा दर आकारल्याने खिशाला झळही बसली. साडेतीननंतर बससेवा सुरळीतएसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील १३ डेपोमधून मध्यरात्रीपासून दुपारी २ वाजेपर्यंत दिवसभरात नियमित होणाºया ३३४० पैकी केवळ १२२५ बसफेºया होऊ शकल्या. त्यात पहाटे तुरळक प्रमाणात शहरात बस धावल्या तर ग्रामीण भागात काही ठिकाणी त्या व्यवस्थित प्रवास करू शकल्या. २११५ बसफेºया झाल्याच नाहीत. यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. बसेसचे मात्र कुठे नुकसान झाले नाही. दुपारी साडेतीननंतर राज्यभरातील बसेस नाशिकहून सोडण्यास प्रारंभ झाला. साडेचार वाजेपासून शहर बससेवा सुरळीत सुरू झाली.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात बससेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:31 AM