नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम एस.टी. महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीवर होताना दिसत आहे. अद्याप प्रवासी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध आलेले नसल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक सुरू आहे. मात्र, प्रतिसाद कमी असल्यामुळे अनेक बसेस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. नाशिक विभागात सद्य:स्थितीत विविध मार्गांवरील ६३ बसेस बंद करण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला गेल्या आठ महिन्यांत केाट्यवधींचा आर्थिक फटका बसला. २०२१ मध्ये यातून महामंडळ सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने एस.टी. महामंडळाला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिकमधून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष बसेस सोडल्या जातात. मात्र, कोरोनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध असल्यामुळे अशा जिल्ह्यांमधील बसेस बंद करण्याची वेळ आलेली आहे.
जिल्हांतर्गत बससेची स्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही. लॉकडाऊन उठविल्यानंतर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू झाली. टप्प्याटप्प्याने बसेस सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ६६८ बसेस धावत होत्या; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे ६३ बसेस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. आता केवळ ६०४ इतक्याच बसेस धावत असून अन्य जिल्ह्यांमधील प्रवासी वाहतूक बंद होऊ लागली आहे.
--इन्फो--
नाशिकहून बीड, नांदेड, हिंगोलीकडे जाणाऱ्या बसेस तेथील निर्बंधांमुळे बंद करण्यात आलेल्या आहेत. नंदूरबारलाही शनिवार, रविवार पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने दोन दिवस नंदूरबारला जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आलेल्या आहेत. गुजरातमध्ये प्रवाशांना ॲन्टिजेन टेस्ट सक्तीची करण्यात आल्यामुळे गुजरात राज्यात जाणाऱ्या बसेसना देखील ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
बीड, नंदूरबार बसेस बंद
कोरेानाचा परिणाम : गुजरातकडे जाणाऱ्या बसेसनाही निर्बंध
नाशिक : नाशिकहून बीड, नांदेड, हिंगोलीकडे जाणाऱ्या बसेसना तेथील निर्बंधांमुळे विश्रांती देण्यात आली असून या गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत. नंदूरबारलाही शनिवार, रविवार पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने दोन दिवस नंदूरबारला जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, गुजरातकडे जाणाऱ्या बसेसना देखील ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
--कोट--
कोरेानाच्या प्रभावामुळे महामंडळाचे उत्पन्न कमी झालेले आहे. ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाहीत असे मार्ग बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये जेथे निर्बंध कठेार करण्यात आलेले आहेत तेथे बसेस पाठविणे बंद करण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षादेखील महत्त्वाची असल्याने अधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये बसेस पाठविल्या जात नाहीत.
--इन्फो--
प्रवासी संख्या २० ते २५ टक्क्याने घटली
- एस.टी.ला पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर बससेवा सुरू झाली असताना हळूहळू प्रवासी संख्यादेखील वाढत होती. मात्र, आता काेरोनाचा कहर पुन्हा झाल्याने जिल्हांतर्गत बसेसचे प्रवासी देखील घटले आहेत. कसेबसे ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत प्रवासी संख्या वाढलेली असताना आता ३५ ते ४० टक्के इतकेच प्रवासी प्रवास करीत आहेत.
- इन्फो--
रातराणी केवळ ०५
नाशिकमधून रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेसची संख्या केवळ पाच इतकी आहे. अमरावती, नागपूर, कोल्हापूर, हिंगोली तसेच लातूर या ठिकाणी रात्रीच्या बसेस पाठविल्या जातात. या बसेसचा प्रतिसाद देखील कमी होऊ लागला आहे.
--इन्फो--
दररोज ६०४ बसेस
मागीलवर्षी लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील १३ डेपोंमधून ८३२ इतक्या बसेस धावत होत्या; परंतु लॉकडाऊननंतर तब्बल आठ महिन्यांनी हळूहळू बसेस सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात ६६७ बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत असताना मार्चमध्ये पुन्हा कोरेानाचा उद्रेक होऊ लागल्याने अवघ्या पंधरा दिवसांत ६३ बसेस बंद करण्याची वेळ आली.
===Photopath===
260321\26nsk_19_26032021_13.jpg
===Caption===
एस.टी. बस डमी