नाशिकरोड : विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात शिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करावेत, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्र्गे यांनी केले. आरंभ महाविद्यालयात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांतर्फे आयोजित लिंकेज कमिटीच्या सभेत दुर्गे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्र. ला. ठोके होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे, उद्योजक तुषार चव्हाण, लघुउद्योग आघाडी नाशिकचे अध्यक्ष उद्योजक संजय महाजन, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, कर सल्लागार संजय खरोटे, सारस्वत बॅँकेचे जेलरोड शाखा व्यवस्थापक सुरेश जाधव, मदन केदारे, व्यवसाय शिक्षण विभागाचे एस. एस. कदम, योगेश शेगावकर, व्यावसायिक ईश्वर शिरसाठ, डॉ. सुनीता टावरी, प्रा. शुभांगी कुलकर्णी, प्रा. श्रीकृष्ण लोहकरे, प्रा. दीपक पर्वतीकर, लेखनिक राजेंद्र वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे, उद्योजक तुषार चव्हाण, मुकुंद कुलकर्णी, संजय महाजन, डॉ. सुनीता टावरी या उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा शैक्षणिक वर्षातील अहवाल प्रा. डॉ. शुभांगी कुलकर्णी व प्रा. जान्हवी शिरवाडकर यांनी पीपीटीच्या माध्यमातून सादर केला. यावेळी संगणक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. रेखा टर्ले यांनी केले. सूत्रसंचालन विभागप्रमुख प्रा. राजेंद्र शेळके व आभार प्रा. दीपक पर्वतीकर यांनी मानले. यावेळी प्रा. अक्षया गोसावी, प्रा. जयश्री सुरवाडे, प्रा. रूपाली शेवाळे, प्रा. सोनल कडवे, दत्तू रोडे, ज्ञानेश्वर पेखळे, सुधाकर मुठाळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नोकरीऐवजी व्यवसाय शिक्षण घ्यावे
By admin | Published: September 28, 2016 12:40 AM