नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी (दि़८)मध्यरात्री छापा टाकला़ पोलिसांनी जुगार अड्डयाचा संचालक व तथाकथित पत्रकार राहुल बागमार उर्फ जैन याच्यासह २१ जुगाºयांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने व मद्यसाठा यासह २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
पंचवटी पोलिसांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवरमधील बी-१ मधील दुसºया मजल्यावरील हॉलमध्ये छापा टाकला असता संशयित अमोल चिचे (, रा. क्रांतीनगर), लक्ष्मण बेंडकुळे ( रा. पेठ रोड), नीलेश शहा (रा. वाघाडी), सचिन बिरादर (रा. पंचवटी), रमेश केदारे (रा. रेल्वे कॉलनी), सोमनाथ खंडारे (रा. वाघाडी), मनोज पंडित (रा. क्रांतीनगर), वासू मोहन नाईक (रा. खडकाळी), मनोज खिंवसरा (रा. रविवार पेठ), विनय गोगालिया ( रा. महालक्ष्मी चाळ), आरिफ शेख (रा. नाशिकरोड), प्रीतम पवार (रा.गजानन चौक), नीलेश ठाकरे (रा. वाघाडी), कृष्णा वानखेडे (रा. वाघाडी), कैलास वाघ (रा़वाल्मिकनगर), हसीन खाटीक (रा़ संजयनगर), शौकत खान (रा. खडकाळी), भरत अहिरे (राक़्रांतीनगर), रफिक पठाण (रा. द्वारका), अदिल शेख (रा़भद्रकाली) हे जुगार खेळत होते़ या जुगाºयांना ताब्यात घेतले असता संचालक बागमार हा घटनास्थळी आला व पोलिसांशी वाद घातला़ यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेऊन रोख रक्कमव मोबाईल जप्त केला़
सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, के. डी. वाघ, रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे, पोलीस हवालदार पाटील, बस्ते, ठाकरे, पोलीस नाईक नरवडे, पवार, पोलीस कॉन्स्टेबल साळुंके, चारोस्कर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रहाणे, कोकणी व गांगुर्डे यांनी ही कारवाई केली़बागमारची परिसरातून धिंड