आडगाव : नाशिक शहर वाहतूक युनिट १ शाखेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरातील व्यावसायिकांना दुकानांसमोर रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगबाबत नोटिसा बजावल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, व्यावसायिकांची अडवणूक करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आडगाव परिसरात महामार्गावर अनेक हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, गॅरेज व्यावसायिक आहे. काही व्यावसायिकांना नाशिक शहर वाहतूक युनिट शाखेच्या वतीने नोटिसा बजावल्याने परिसरात अस्वस्थता पसरली आहे. दुकानाच्या समोर पार्किंगसाठी जागा नसल्याचे कारण देत नोटीस बजावली गेली असून, प्रत्यक्ष आपले म्हणणे सादर करण्यासाठी युनिट १ कार्यालयात समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहे. याबबत वाहतूक शाखेच्या कार्यालयात विचारणा केली असता मालवाहतूकदरांचा संप सुरू असल्याने नोटीस बजावण्याचे कामकाज थांबवले आहे. आंदोलन संपल्यानंतर अनधिकृत रस्त्यावर दुकानासमोर उभी करणाºया वाहनचालकांवरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे समजते. पण, हायवे असल्यामुळे रस्त्याच्या कडेला ग्राहकच नाही. नानाविध कारणामुळे अनेक मालवाहतूक गाड्या उभ्या असतात. बºयाचदा अशी वाहने दुकानांच्या समोर उभी करतात, पण अशा वाहनचालकांनादेखील वाहने उभी करू नका, असे सांगितल्यास वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे बेशिस्तपणे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनचालकांवर कारवाई करावी. व्यावसायिकांना वेठीस धरू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या हेतुने द्वारकापासून कोणार्कनगरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड उभारण्यात आले, पण या सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग, अतिक्र मण आणि बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे सर्व्हिस रोडने प्रवास करणाºया वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बरेच सर्व्हिसरोडऐवजी मुख्य मार्गाचा वाहतुकीला वापर करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. या ठिकाणी याच मार्गावर नवीन आडगाव नाका येथे युनिट १ चे कार्यालय असून, नवीन आडगाव नाका ते पंचवटी कॉलेज अशा दोन्ही बाजंूच्या सर्व्हिस रोडवर सर्रासपणे वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पण येथील व्यावसायिकांवर व वाहनांवर कुठलीही कारवाई वाहतूक शाखेकडून न करता शहरापासून बाहेर असलेल्या व अजून पुरेशा सुविधादेखील मिळत नसलेल्या आडगाव परिसरांतील व्यावसायिकांना नोटिसा बजावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पार्किंगसाठी जागा असूनही नोटीसकाही व्यावसायिकांकडे पार्किंगसाठी पुरेशी जागा असूनदेखील नोटीस बजावण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुकानासमोर रस्त्यावर होणाºया अपघातांची जबाबदारी व्यावसायिकांची असून, या वाहनांमुळे अपघात झाल्यास व्यावसायिकास जबाबदार धरण्यास येईल, असा नोटीसमध्ये उल्लेख आहे, पण हायवे असल्याने बºयाचदा दुकानातील ग्राहकच नाही तर कोणीही दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात, त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास वाद निर्माण होतात. त्यामुळे व्यावसायिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत.
नोटिसांमुळे व्यावसायिक अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:23 AM