नाशिक : शहरात सोमवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी चार वाजेपासून आणखीनच जोर धरला असून रात्री आठनंतरही पावसाची संततधार सुरुच असल्याने शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. नाशिक शहरासह परिसरात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील विविध भागात पाणी साचले होते. नाशिकच्या मुख्य बाजारपेठेसह मध्य नाशिकलादेखील पावसाने झोडपून काढले होते.सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरातील रस्ते काही काळ ओस पडल्याचे चित्र दिसून आले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांत दमदार पाऊस झाला असून सोमवारी झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहरात दुपारपासूनच पावसाची रिरिप सुरु असल्याने फेरीवाले सावध असल्याने त्यांनी दुकाने लवकरच आवरती घेतली. परंतु सायंकाळी पावसाचा जोर आणखीनच वाढल्याने मेनरोड, दहीपूल, सराफ बाजार परिसरात पावसाचे पाणी काही दुकानांमध्येही शिरले. त्यामुळे व्यावसायिकांना दुकानातील माल वाचविण्यासाठी कसरत करावी लागली. काही दुकानांमधील माल ओला झाल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.
दहीपुल भागातील दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी ; व्यावसायिकांचे मोठे नूकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 8:30 PM
नाशिक शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.
ठळक मुद्देनाशकात पावसाची संततधार बाजारपेठेत पाणी शिरले पावसाचे पाणी दुकानांतील माल भिजल्याने नूकसान