नाशिक : उद्योजकांच्या समस्या व प्रश्न जाणून सरकार उद्योजकांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक असून, राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन तातडीने लक्ष घालेल. त्याचबरोबर भाड्याने दिलेल्या मिळकतीवरील घरफाळा आकारणी कमी करण्यासंबंधी शासनाने यापूर्वीच निर्देश दिले आहेत त्याबद्दल अडचणी आल्यास सरकारकडून कारवाई केली जाईल. वीज दरवाढीबाबतीतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्र्रिकल्चरच्या शिष्टमंडळाने चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील उद्योजकांच्या विविध समस्या व प्रश्नांची माहिती फडणवीस यांना दिली तसेच राज्यातील औद्योगिक प्रश्नांवर चर्चा केली.या मागण्यांवर झाली चर्चामहाराष्ट्रातील उद्योजकांना बळ देण्यासाठी वीज दरवाढ कमी करावी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना वीज दरामध्ये विशेष अनुदान द्यावे या मुख्य मागणीबरोबर एलबीटी, औद्योगिकनगरी, विमानसेवा या बाबींवर उद्योजक व व्यापारी यांच्यामागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी, आशिष पेडणेकर, करु णाकर शेट्टी व अनिल गचके, महावीर गाठ, आशिष नहार, सरव्यवस्थापक सागर नागरे आदींचा समावेश होता.
उद्योजकांच्या समस्या : मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:39 AM