नाशिक : निसर्गाचा खरा दागिना म्हणून पक्षी ओळखले जातात. पक्ष्यांचे महत्त्व ग्रामिण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या काव्यातून अधोरेखित करत माणसाला ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस’ असा उपरोधिक प्रश्नही विचारला आहे. दिवसेंदिवस वाढणाºया सिमेंट कॉँक्रीटच्या जंगलात पक्षी-प्राण्यांची घुसमट होऊ लागली आहे. पक्ष्यांविषयीची जनजागृती होणे आणि भावीपिढीचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने नाशिक वन्यजीव विभागाने प्रथमच ‘बर्ड फेस्टिव्हल’ भरविले होते. या फेस्टिव्हलने नैसर्गिक जैवविविधतेच्या जागृती अभियानाला एकप्रकारे बूस्ट दिला. विविध पक्षी प्रेमींची मांदियाळी यावेळी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पहावयास मिळाली.
नैसर्गिक जैवविविधतेविषयी जागृतीला नांदूरमधमेश्वरच्या ‘बर्ड फेस्टीव्हल’ने दिला ‘बूस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 2:15 PM
या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.
ठळक मुद्देविविध जातींचे पक्षी, त्यांचे प्रकार, सौंदर्य, वैशिष्ट्य आणि महत्त्व याविषयी मंथन नाशिकपासून हे अभयारण्य अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर नाशिक वन्यजीव विभागाने प्रथमच ‘बर्ड फेस्टिव्हल’ भरविले होते