नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावा सापडू नये यासाठी दुकानातील सीसीटीव्हीच्या केबल कापून फुटेजचे तीन डीव्हीआर मशीनही चोरून नेले होते़ या चोरीत दुकानातील दोघा कर्मचाºयांसह आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी शनिवारी (दि़२३) पत्रकार परिषदेत दिली़निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील अॅक्सिस बँकेशेजारी अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे़ गुरुवारी (दि़२१) मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाच्या स्ट्राँगरुममधील तिजोरी उघडून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची धाडसी चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती़ या चोरीचा तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकातील अधिकारी कर्मचाºयांनी तिजोरीची बारकाईने पाहणी करून दुकानात काम करणारे सेल्समन, सेल्सगर्ल, कारागीर, शिपाई, सुरक्षारक्षक अशा चौदा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली़पोलिसांना दुकानात साफसफाईचे काम करणारा उंबरखेड रोडवरील हनुमान चौकातील विधी संघर्षित बालकाबाबत संशय आल्याने कसून चौकशी केली़ या मुलाकडे दुकानाची साफसफाई, दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या सर्व चाव्या वरच्या रुममध्ये ठेवणे व सकाळी दुकान उघडताना सर्व चाव्या मालकास आणून देण्याचे काम होते़ त्याची कसून चौकशी केली असता दुकानातील सेल्समन संजय देवराम जाधव (३२, रा़परसूल, ता़चांदवड) याच्या मदतीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली़संजय जाधव हा २०१५ पासून दुकानात कामास असल्याने त्याच्याकडे दररोज स्ट्राँगरूम उघडून दुकान लावणे तसेच रात्री दुकान आवरून दागिने तिजोरीत ठेवण्याचे काम होते़ या विधीसंघर्षित बालक व वाघ या दोघांनी तिजोरीतील चोरी केलेले दागिने बॅगमध्ये भरले़ वाघ याने ही बॅग चांदवड तालुक्यातील परसूल येथील भाचा संशयित गोपीनाथ दत्तू बरकले (२५) याच्याकडे देऊन लपवून ठेवण्यास सांगितले़ स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीची उकल करून हे सर्व दागिने हस्तगत केले़सराफी दुकानातील सोने चोरीप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात संशयित संजय वाघ, गोपीनाथ बरकले व विधीसंघर्षित बालक या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 8:42 PM
पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़
ठळक मुद्दे ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीदुकानात काम करणारे सेल्समन, सेल्सगर्ल, कारागीर, शिपाई, सुरक्षारक्षक असे चौदा जण ताब्यात