कळवण : नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे भरपूर उत्पादन असल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ठिकठिकाणी नाफेडच्या वतीने शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येणार आहे. कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून सरकारने हे पाऊल उचलले असून, कळवण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडतर्फेकांदा खरेदीचा शुभारंभ सोमवारी (दि. ९) कळवणच्या शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांच्या हस्ते बाजार समितीच्या नाकोडे आवारात करण्यात आला.यावेळी शेतकरी सहकारी संघाचे संचालक निंबा पगार, बाजार समितीचे संचालक हेमंत बोरसे, कांदा व्यापारी मुरलीधर अमृतकार,जयवंत पगार, नंदू वाघ, बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, शेतकरी संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण गांगुर्डे व नाफेडचे जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कांदा खरेदीसाठी कळवणच्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून खरेदी-विक्र ीची व्यवस्था पाहिली जाणार आहे. नाफेडच्या या कांदा खरेदीमुळे बाजारभावात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. नाफेडने सोमवारी व मंगळवारी ८५० क्विंटल कांदा सरासरी १२४४ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला. कांदा व्यापाऱ्यांनी मंगळवारी सरासरी ११५०-१२०० दराने ४८५ वाहनांतून आलेला कांदा खरेदी केला.कांद्याच्या भावामुळे हैराण झालेल्या शेतकºयांना नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार असून, भेंडी येथील कांदा व डाळिंब निर्यात प्रक्रि या केंद्रातील पणनच्या कांदा चाळीमध्ये कांदा साठवणूक व्यवस्था करण्यात आली आहे. कांदा साठवणूक करून आगामी काळात मोठ्या शहरात विक्र ी करण्यात येणार आहे. उच्च प्रतीचा कांदा प्रचलित बाजारभावात सर्वोच्च दराने खरेदी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेले आहेत. सदर कांदा विक्र ीचे पैसे शेतकºयांना तत्काळ धनादेशाने देण्यात येत आहेत.
शेतमालाचे भाव पडल्यावर केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण कोषातून शेतमाल खरेदी करण्याची योजना सरकार राबविते. सदरची कांदा खरेदी या योजनेंतर्गत होत असून, शेतकºयांना नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार आहे.- सुधाकर पगार, अध्यक्ष,शेतकरी सहकारी संघ, कळवण.