नाशिक : सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुतांश नागरिक त्याचे पालनदेखील करीत आहेत. तथापि, त्यामुळे रस्त्यावर विक्रीसाठी असलेले विविध रंगी हलके आणि मॅचिंग धोकादायक ठरू शकतात. रस्त्यावरील कोणीही ग्राहक सहजरीत्या असे मास्क हाताळतात तोंडाला बांधून बघतात आणि परत देऊन टाकतात, त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे.कोरोनाबाबत नागरिक आता बऱ्यापैकी सजग झाले आहेत. आणि मास्क घालूनच बाहेर पडताना दिसतात. परंतु मास्क कसे असावेत याबाबत वैद्यकीय शास्त्रात काही नियम आहे. सुरुवातीला एन-९५ मास्कचा बरीच चर्चा होती. मात्र, तो प्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच आवश्यक असून, सामान्य नागरिकांनी साधारण तीन पदरी मास्क वापरला तरी पुरे असे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे एन-९५ मास्कच हवा या आग्रहातून सुरू झालेला काळाबाजार थांबला. परंतु आता बाजारात मास्कचा सुळसुळाट झाला आहे.रस्त्यावर अत्यंत पातळ, रंगीत आणि हलके मास्क विकले जात आहेत. असे मास्क पाहून आकर्षित होणारे नागरिक रस्त्यावर थांबून मास्कला हात लावतात. त्याची फिटिंग तपासणीसाठी तोंडालाही लावून बघतात आणि नंतर नको असलेला मास्क परत विक्रेत्याकडे देतात. त्यानंतर येणारे नागरिक अशाच प्रकारची कृती करतात. त्यामुळे समजा एखाद्या नागरिकाला कोरोनाचा संसर्ग असेल तर साहजिकच दुसºयाने तोंडाला मास्क लावल्यास त्यालादेखील संसर्ग होऊ शकतो. त्याबाबत काळजी घेतली जात नाही. कोणी नागरिकाने तोंडाला मास्क लावला नाही तरी केवळ हाताळण्यातूनही तो कोरोना विषाणूचा वाहक ठरू शकतो. रंगीत मास्कबाबत महिलावर्ग आग्रही असतो. कपड्यांवर मॅचिंग मास्कदेखील घेण्याकडे त्यांचा कल असतो. अनेकदा तर दुकानदार हाताळतात त्यामुळेदेखील धोका वाढतो. त्यामुळे वैद्यकीय नियमानुसार असलेले मास्क वापरावेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मास्कबाबत काय घ्यावी काळजी?एन-९५ मास्क हे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाºयांनी वापरावेत.४रस्त्यावरील मास्क एक पदरी असतात, ते टाळावेत.४शक्यतो तीन पदरी कापडाचे मास्कच वापरावेत.४औषधांच्या दुकानात हापकिनची मान्यता असलेलेच घ्यावेत.४कापडी मास्कचा वापर करताना किमान दोन असावेत एक वापरल्यानंतर धुवून घ्यावा तोपर्यंत दुसरा मास्क वापरावा.४कापडाचा मास्क वापरताना कापडाचा दर्जा तपासून घ्यावा.
रस्त्यावर मास्क खरेदी करताहेत... पण जरा काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:31 AM
सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुतांश नागरिक त्याचे पालनदेखील करीत आहेत. तथापि, त्यामुळे रस्त्यावर विक्रीसाठी असलेले विविध रंगी हलके आणि मॅचिंग धोकादायक ठरू शकतात. रस्त्यावरील कोणीही ग्राहक सहजरीत्या असे मास्क हाताळतात तोंडाला बांधून बघतात आणि परत देऊन टाकतात, त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे.
ठळक मुद्देदक्षता घेण्याची गरजहाताळण्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका ग्राहक ठरू शकतो विषाणू वाहक