नाशिक : सुख-दु:खाच्या घटना-घडामोडींची शिदोरी सोबत घेऊन सरत्या वर्षाला अलविदा करताना गारठून टाकणाºया थंडीत रविवारी ‘थर्टी फर्स्ट’ नाइटचा जलवा पाहायला मिळणार असून, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. शहरातील हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना आकर्षित करण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल असणार आहे, तर सकाळी मिस्सळ पार्टीपासून ते लेटनाइट साग्रसंगीत डिनरची आखणी नाशिककरांनी केली आहे.रविवार (दि.३१) सुटीचा दिवस, त्यात सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि सोबतीला थंडीचा तडका, असा संयोग जुळून येत असल्याने थर्टी फर्स्टची नाइट दणक्यात साजरी होण्याची चिन्हे आहेत. विशेषत: थर्टी फर्स्टचे आकर्षण असणाºया आणि खºया अर्थाने सेलिब्रेशन एन्जॉय करणाºया तरुणाईच्या जल्लोषाला उधाण येणार आहे. थर्टी फर्स्टच्या नाइटसाठी शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिर्सोट््स आणि वायनरीज खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. अनेक हॉटेल्स-रिर्सोट््स विद्युत रोषणाईने झगमगली असून, लाइव्ह बॅण्ड, मॅजेशियन, गेम्स, डान्स फ्लोअर, डीजे वॉर या उपक्रमांची आखणी करण्यात आलेली आहे. निसर्ग पर्यटनाचे बेतसरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचे अनोखे अंदाज पाहायला मिळतील. अनेक कुटुंबीयांनी रविवारच्या सुटीचे औचित्य साधत शहरालगत असलेल्या नांदूरमधमेश्वर, भंडारदरा, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, बोर्डी आदी भागांत निसर्ग पर्यटनाचे बेत आखले आहेत. शहरात काही संस्थांनी सांगीतिक मैफलींचे आयोजन केले असल्याने नाशिककरांची सरत्या वर्षाची सायंकाळ सुरेल बनणार आहे.
अलविदा २०१७ : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्जथंडीचा कडाका;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:39 AM
नाशिक : सुख-दु:खाच्या घटना-घडामोडींची शिदोरी सोबत घेऊन सरत्या वर्षाला अलविदा करताना गारठून टाकणाºया थंडीत रविवारी ‘थर्टी फर्स्ट’ नाइटचा जलवा पाहायला मिळणार असून, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. शहरातील हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना आकर्षित करण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल असणार आहे, तर सकाळी मिस्सळ पार्टीपासून ते लेटनाइट साग्रसंगीत डिनरची आखणी नाशिककरांनी केली आहे.
ठळक मुद्दे‘थर्टी फर्स्ट’चा जलवा वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल