शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

तब्बल २०० विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 3:33 PM

जानोरी : अध्ययन-अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड, नाविन्यपूर्णता, शिक्षकांचे उल्लेखनीय कर्तृत्व, उपक्र मशीलतेतून वाढलेली शाळांची लोकप्रियता आणि गुणवत्ता यामुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. याच बदलामुळे दिंडोरी तालुक्यातील २०० च्यावर विद्यार्थ्यांनी खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय करत तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

ठळक मुद्दे दिंडोरी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत घेतला प्रवेश

अशोक केंगजानोरी : अध्ययन-अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड, नाविन्यपूर्णता, शिक्षकांचे उल्लेखनीय कर्तृत्व, उपक्र मशीलतेतून वाढलेली शाळांची लोकप्रियता आणि गुणवत्ता यामुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्याशाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. याच बदलामुळे दिंडोरी तालुक्यातील २०० च्यावर विद्यार्थ्यांनी खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय करत तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहेत. तथापी ‘शाळा बंद-शिक्षण सुरु ’ या उपक्र मांतर्गत दिंडोरी तालुक्यातील शिक्षक वर्गाने नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवले आहे. विविध माध्यमांचा वापर करु न खेड्या-पाड्यातील तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहचत आहेत.यामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष गृहभेटी, गावातील मोकळ्या जागेचा वापर, गल्लीमित्र, मोबाइलद्वारे व जाणकार पालकांच्या मदतीने अभ्यास घेतला जात आहे. गाव तेथे वाचनालय, डोनेट अ‍ॅडव्हाईस, तंत्रसेतू, टिलीमिली व विद्यावाहिनी सारख्या रेडीओ कार्यक्र मांची मदत घेतली जात आहे. शिक्षकांनी स्वखर्चाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध करु न दिल्याने सातत्यपूर्ण सराव व दृढीकरणावर भर दिला जात आहे.जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलून अध्यापनाचा दर्जा उंचावल्याने पालकांचा दृष्टिकोन बदलला असून, नव्या दमाच्या शिक्षकांना जुन्या अनुभवी शिक्षकांच्या अनुभवाची दुहेरी जोड मिळाल्याने परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, ज्ञान रचनावादाचा उपयोग, डिजीटल शाळा, आयएसओ प्रमाणपत्र दर्जा, प्रगत उपक्र मशीलतेमुळे इंग्रजी तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा हव्या हव्याशा वाटत आहेत. इंग्रजी माध्यमापेक्षाही दर्जेदार शिक्षण मोफत मिळू लागल्याने विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षित होत आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी देखील आपले विद्यार्थी गुणवंत व्हायला हवेत याहेतूने स्वत:मध्ये अमुलाग्र बदल केले आहेत.विशेष म्हणजे शासनाकडून अत्यल्प मदत मिळत असतांना पालकांबरोबर तसेच दानशूर व्यक्तिंशी संबंध दृढ करत शाळांमध्ये भौतिक सुविधांबरोबरच डिजीटल साहित्य खरेदीपर्यत उल्लेखनीय लोकसहभाग मिळवला आहे. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद शाळांचे नवे पर्व सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या चार मिहन्यांचा शाळा बंद कालावधी असून सुद्धा खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून ९४ व खाजगी मराठी माध्यमाच्या शाळेतून १०९ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.चौकट...१) शाळा बंद कालावधीत विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रि या सुरु ठेण्यासाठी शिक्षकांची तळमळ व सकारात्मक प्रयत्न यशस्वी ठरलेले आहेत. शिक्षकांचे हे प्रयत्न पालक वर्गास दिसून आल्याने त्यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेला आहे.- बी. डी. कनोज, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी.२) माझी कन्या खाजगी शाळेत शिक्षण घेत होती. परंतू भरपूर पैसे खर्च करूनही अपेक्षित गुणवत्ता दिसून न आल्याने व आमच्या वनारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तुलनेने चांगली असल्याने मी आमच्या गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.- संपत ठाकरे, पालक, वनारवाडी.३) कोवीड १९ च्या संकटावर मातकरत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराळे बु. या शाळेतील शिक्षकांच्या आॅनलाईन, आॅफलाईन शिक्षणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून ३२ विद्यार्थी दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी घेतलेली मेहनत व शाळेची वाढलेली गुणवत्ता त्यामुळे माझे २ मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल केली आहेत.- भारत धात्रक, पालक, उमराळे बु.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा