शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:55 AM

देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभागात पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव नसल्याने पक्षाची मदार भोसले कुटुंबीयावरच असणार आहे, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीतही अंतर्गत बंडाळीच्या शक्यतेने द्विधावस्था निर्माण झालेली आहे.

नाशिक : देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभागात पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव नसल्याने पक्षाची मदार भोसले कुटुंबीयावरच असणार आहे, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीतही अंतर्गत बंडाळीच्या शक्यतेने द्विधावस्था निर्माण झालेली आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी येत्या २० मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. आतापर्यंत केवळ एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १३ मध्ये मनसेच्या सुरेखा भोसले यांच्यासह कॉँग्रेसचे शाहू खैरे व वत्सला खैरे आणि राष्टÑवादीचे गजानन शेलार निवडून आले होते. त्यावेळी, याच प्रभागात मनसे, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी अशी अघोषित युती बघायला मिळाली होती. आता, पोटनिवडणुकीत सदर जागेसाठी मनसेकडून भोसले कुटुंबीयातील अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. सद्यस्थितीत मनसेचा राज्यभर ओसरलेला प्रभाव आणि नाशिकमध्येही झालेली वाताहत पाहता पोटनिवडणुकीत पक्ष म्हणून फारसा प्रभाव राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे, पक्षाची मदार ही सर्व भोसले कुटुंबीयावरच आहे. पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे प्रचार सभेला येतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यात, गर्दी जमविणारे स्थानिक असे नेतृत्व उरले नसल्याने पक्षाच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मनसेच्या हातातून सदर जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाला महापालिकेतील गेल्या वर्षाच्या सत्ताकाळातील नागरिकांचा कौल आजमावण्याची यानिमित्ताने संधी चालून आली आहे, तर शिवसेनेने भाजपाच्या वर्षभराच्या कारभाराचा हिशेब मांडत समीकरणे बदलण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून ताकदवार उमेदवाराला पसंती दिली जाणार आहे. त्यात, शिवसेनेकडून माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण, तर भाजपाकडून माजी नगरसेवक हरीश लोणारी यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. भोसले कुटुंबीयातील सदस्य असेल, तर उमेदवार न देण्याची घोषणा करणाऱ्या कॉँग्रेस-राष्टÑवादीत मात्र द्विधा मन:स्थिती आहे. दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ असा उमेदवार नाही. त्यात, बंडखोरीची शक्यता वाढली आहे. माजी नगरसेवक रंजना पवार तसेच कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या पत्नी यांनीही उमेदवारीची तयारी चालविली आहे. याशिवाय सत्ताधारी भाजपातही बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोमवारी होणार अर्ज दाखलपोटनिवडणुकीसाठी २० मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. चार दिवसांत अवघा एकच उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. शनिवारी (दि.१७) अमावास्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. रविवारी गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आहे. परंतु, त्यादिवशी कार्यालयाला सुटी असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. त्यामुळे सोमवारी (दि. १९) मनसेसह सेना-भाजपाकडून उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून आवश्यक ती ना हरकत पत्रे प्राप्त करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक