शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

आॅगस्ट २०१६ मध्ये पोटनिवडणूक

By admin | Published: July 18, 2016 12:21 AM

नाशिकरोड प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब)

नाशिक : नाशिकरोड विभागातील मनसेचे नगरसेवक नीलेश तुकाराम शेलार आणि शोभना संजय शिंदे यांचे सदस्यत्व रद्दबातल ठरविल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) मधील सदस्यपदासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये पोटनिवडणूक होणार असून, त्यासाठी शनिवारी (दि.१६) प्रारूप मतदारयादी घोषित करण्यात आली. प्रारूप मतदारयादीनुसार दोन्ही प्रभाग मिळून १७३४ मतदार वगळण्यात आले आहेत. सदर प्रारूप मतदारयादीसंबंधी २३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्हिप बजावूनसुद्धा पक्षविरोधी मतदान करणारे नाशिकरोडचे नगरसेवक नीलेश शेलार व शोभना शिंदे यांचे सदस्यपद रद्दबातल ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निकाल विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दि. २९ मार्च रोजी दिला होता. या निर्णयाविरोधी शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी अद्याप त्यासंबंधी न्यायालयाचा कुठलाही आदेश महापालिकेला प्राप्त झालेला नाही. पोटनिवडणुकीची प्रारूप मतदारयादी१७३४ मतदार वगळले : शनिवारपर्यंत हरकती, सूचना मागविल्यात्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. सदर रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप मतदारयादीनुसार, प्रभाग ३५ मध्ये १० हजार ९९३, तर प्रभाग ३६ मध्ये १०७२४ मतदारसंख्या आहे. त्यात प्रभाग ३५ मधून ६७० मतदार, तर प्रभाग ३६ मधून १०६४ मतदार वगळण्यात आले आहेत. पुरवणी यादीत प्रभाग ३५ मध्ये ४९०, तर प्रभाग ३६ मध्ये ३२४ मतदार वाढले आहेत. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ३५ मध्ये दहा हजार ४८४, तर प्रभाग ३६ मध्ये ११ हजार ४४५ मतदार होते. सदर प्रारूप मतदारयादीविषयी २३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अंतिम मतदारयादी ३० जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ जुलै २०१६ रोजी अस्तित्वात येणारी विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचे आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेमार्फत प्रारूप मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी दोन्ही प्रभागांसाठी प्रत्येकी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, तर प्राधिकृत अधिकारी म्हणून उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांना नियुक्त करण्यात आले आहे. अंतिम मतदारयादी घोषित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग येईल. (प्रतिनिधी)