नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झाला अन् या शेतकºयाला त्या गाडीचे भाडे १३०० रुपये द्यावे लागले असल्याची धक्कादायक स्थिती आहे. किरकोळ खरेदीदारांअभावी नाशिक बाजार समितीत येणाºया अनेक भाजीपाल्याचे लिलावच झाले नसल्याचे दिसून आले.नाशिक येथून वाशी (मुंबई) आणि गुजराथमध्ये भाजीपाला जात असतो. नाशिक बाजार समितीत खरेदी केलेला माल येथील व्यापारी या बाजारांमध्ये पाठवित असतात. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात असलेल्या संचारबंदीमुळे वाशी, गुजराथ येथील बाजारांमध्ये किरकोळ स्वरूपात माल खरेदी करणारे व्यापारीच पाहोचत नसल्याने या बाजारांमध्ये पाठविलेला माल पडून राहतो. पर्यायाने नाशिक येथील बाजार समितीमध्ये खरेदी मंदावली आहे. शुक्रवारी (दि.२७) नाशिक येथील बाजार समितीमध्ये सुमारे २५० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. त्या संपूर्ण वाहनांमधील मालाचा लिलाव होऊ शकला नाही. त्यातील काही वाहनं दुसºया दिवसांपर्यंत बाजार समितीत उभीच होती. लिलाव झालेच तर भाजीपाल्याला फारसा भाव मिळत नाही. कोबीची गाडी ५०० ते ७०० रुपयांना विकली जात असल्याची स्थिती आहे. यामुळे भाजीपाला विकून प्रत्यक्ष शेतकºयांच्या हाती काहीच पडत नसून मधल्या दलालांचा मात्र फायदा होत असल्याचे चित्र सध्या बाजार समितीमध्ये आहे. शेतकºयांनी पिकविलेल्या भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच साधे गाडीभाडे निघणेही मुश्कील झाले आहे. यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भाजीपाला वितरणासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.नाशिक बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाल्याची चांगली आवक आहे. मात्र येथून जाणाºया मालाला पुढे ग्राहक मिळत नसल्याने शेतकºयांच्या हाती फारसे काही पडत नाही. शनिवारी सकाळी भाजीपाल्याची आवक चांगली झाली, मात्र तो माल पडून होता. किरकोळ खरेदीदार व्यापाºयांना बाजार समितीपर्यंत येऊच दिले जात नसल्याने माल पडून राहतो आहे.- संपतराव सकाळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
कोबीचा लिलाव ७०० अन् गाडीभाडे १३०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:18 PM
नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झाला अन् या शेतकºयाला त्या गाडीचे भाडे १३०० रुपये द्यावे लागले असल्याची धक्कादायक स्थिती आहे. किरकोळ खरेदीदारांअभावी नाशिक बाजार समितीत येणाºया अनेक भाजीपाल्याचे लिलावच झाले नसल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट । खरेदीदार व्यापारीच नसल्याने शेतकऱ्यांचा माल मातीमोल