खामखेडा : खामखेडा गावासह परिसरात कोबी पिकावर काटकरपा डावण्या, व आळीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.खामखेडा सावकी पिळकोस भादवन विसापुर भऊर बगडु आदि परिसरात कोबी पिकाचे उत्पादन घेतले जाते. कोबी उत्पादनात खामखेडा व परिसराचे नाव गुजरात राज्यातील अहमदाबाद ,सूरत ,बडोदा,आदि मार्केट मध्ये नाव आहे.तेथील काही व्यापारी कोबी खरेदी साठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करतात .त्यामुळे परिसरातील तरु णांना कमीशन म्हणून रोजगार मिळतो. मंजूर वर्गाला काम मिळते.या वर्षी कमी पावसामुळे उष्णवातावरणामुळे कोबी पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला.सुरु वातीला कोबीवर डावण्या, करपा ,कीड,अळीरोगाचा दिसून आला.त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व कोबीचे नुकसान होते.अनेक महगिड ओषधाची फवारणी करूनही पिक आटोक्यात येत नसल्याने काही शेतकर्यान्या कोबीचे पीक सोडून देण्याची वेळी आली आहे.त्यात निसर्गाची साथ न मिळाल्याने उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकर्याला आर्थिक फटका बसत आहे.तसेच सध्या कोबीच्या भावातही मोठया प्रमाणात घसरणा झाल्यामुळे कमी भाव असल्यामुळे पिकावर केलेला खर्चही भरून मिळत नाही .त्यामुळे शेतकर्याला आर्थिक फटका बसला आहे.काही शेतकरयांनी तर औषधें मारूनही काहीच उपयोग होत नसल्याने रोटर मारून नांगर फिरवला आहे.- खामखेडा परिसरात कोबी पिकावर डावण्या व करप्पा रोगाचा प्रादुर्भाव.