खामखेडा : भाजीपालावर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून, गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमध्येही गावाचे प्रसिद्ध असल्याने दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड केली जाते.कोबी लागवड ही साधारण जुलै महिन्यात केली जाते. गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी गावातील ठरावीक शेतकरी कोबीची लागवड करीत असे. त्यामुळे त्यांना कोबी विक्रीसाठी गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी जावे लागत असे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात कोबीची लागवड केली जात असल्याने गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कोबीची खरेदी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कोबीची लागवड केली होती. पीक विक्र ीसाठी तयार झाले आणि सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने कोबी खरेदीसाठी व्यापारी आले नाही. यामुळे पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. तरीसुद्धा काही ठिकाणी शेतकरी पावसाळी कोबी पिकाची लागवड करताना दिसून येत आहे. काही ठिकाणी बळीराजांने भाजीपाला पिकांवर जास्त भर दिल्याने दिलासा मिळाला आहे.रब्बी हंगामात भरपूर भांडवल खर्च करूनही या हंगामातील कोणत्याही पिकांने साथ दिली नाही. त्यामुळे बळीराजांच्या डोळ्यात अश्रू आले होते. एक बाजूला कोरोना व दुसरे बाजुस पिकविलेल्या शेती मालासाठी कोणत्याही प्रकारची भावाची हमी नसल्यामुळे बळीराजांला इकडे आड , तिकडे विहीर. अशी गत होऊन बसली होती. त्यामुळे आता खरीप हंगामासाठी शेतकरी आता नियोजन करीत आहे.---------------------स्थानिक मजुरांना मिळतो रोजगारदोन-तीन वर्षांपूर्वी कोबी पिकाने अनेक शेतकºयांचे स्वप्न फुलविले आहे. त्यामुळे परिसरात शेतकरी हमखास कोबीची लागवड करतो. त्यामुळे गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकºयांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करीत आहे. शेतकºयाला बांधावर रोख पैसे मिळतात. शेतकºयाचे आडत, हमाली, व गाडीभाडे तर वाचतेच त्याचबरोबर वेळेचीही बचत होते. ही कोबी शेतातून काढून ती गोणीत भरून त्या गोण्या गाडीत भरण्यासाठी मजुराची आवश्यकता असते. तेव्हा व्यापारी गावातील काही तरु ण मुलांना शेतातून कोबी काढून ती गोणी गाडीत भरून देण्यासाठी मजूर उपलब्ध करून देतात. तेव्हा त्यांना त्याबदल कमिशन मिळते. त्याचबरोबर स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.
खामखेडा परिसरात कोबी लागवडीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 8:49 PM