नाशिक : राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत शनिवारी (दि.४) वणी येथील साडेतीन शक्ती पिठापैकी आदयपीठ संबोधले जाणाऱ्या सप्तश्रृंगी मातेच्या चरणी नतमस्तक झाले. राज्याच्या कारभारात मुख्यमंत्री जे खाते देतील त्यात काम करण्यासाठी बळ मिळण्याकरीता आदिशक्ती मला आशिर्वाद देईल, असे सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिक जिल्हा दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी वणी येथील सप्तशृंगी गडावर भेट देऊन आदिशक्तीचे दर्शन घेतले. यावेळी गडावरील ग्रामस्थ संदीप बेनके, गिरीश गवळी, सुदर्शन दहातोंड, बंडू कापसे, हेमंत चंद्रात्रे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कळवण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी आपल्याला मिळालेल्या जबाबदारीला न्याय देऊ अशी ग्वाही दिली तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या राजीनाम्यासंबंधी त्यांना विचारणा करण्यात आली असता मुख्यमंत्री हे सत्तार यांची समजूत काढतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या राजीनाम्याची बातमी समजल्यानंतर आपणही त्यांच्याशी संपर्क साधत असून ते उपलब्ध होत नसल्याचेही सामंत यांनी सांगितले.
कॅबिनेटमंत्री उदय सामंत वणीच्या सप्तशृंगी चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 6:01 PM
नाशिक दौरा : मुख्यमंत्री सत्तारांची समजूत काढतील
ठळक मुद्देआपल्याला मिळालेल्या जबाबदारीला न्याय देऊ अशी ग्वाही